“….तर एकनाथ शिंदे हे ठाकरेंना सोडून गेले नसते”, भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

Uddhav Thackeray l विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अशातच येत्या 5 डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी हे देखील उपस्थित राहणार आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठी टीका केली आहे.

लाड यांनी ठाकरेंना टोला लगावला :

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदेना गोंजारेल. “निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचे ते एकनाथ शिंदेंच्या बाबतीत करतील” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र आता यावरुन भाजपच्या दिग्गज नेत्याने उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते असा खोचक टोला भाजपचे दिग्गज नेते प्रसाद लाड यांनी लगावला आहे. अशातच सध्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अनेक बैठका देखील पार पडत आहे. तसेच या बैठकीला महत्त्वाचे नेते देखील उपस्थितीत अहोते. मात्र याच बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray l ठाकरेंनी वाईट वागणूक दिली :

आतापर्यंत ड्रमगेट ते मेनगेट आणि मेनगेट तू ड्रमगेटच्या बाहेर उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात ते फक्त तीन वेळा गेले होते. त्यानंतर फेसबुक लाईव्हवर त्यांनी सरकार चालवलं असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

याशिवाय आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते तर एकनाथ शिंदे सोडून गेलेच नसते. तसेच सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाईट वागणूक देखील दिली आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आमदार बाहेर पडले आहेत. मात्र आता उरलेले आमदार देखील बाहेर पडतील म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका केली आहे.

News Title –  Maharashtra Government formation prasad lad comment on uddhav thackeray 

महत्त्वाच्या बातम्या-

“मला 60 दिवसांच्या आत उचललं नाही, तर कंबोज बापाचं नाव बदलणार”

“शिवसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट चांगला त्यामुळे…”; मंत्रीपदाबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य

लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांकडून सर्वात महत्त्वाची अपडेट!

नवीन मुख्यमंत्री कोण होणार? संजय शिरसाट यांनी दिली माहिती