Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत”

File Photo

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. गुरुवारी राज्यापालांना उत्तराखंडला एका कार्यक्रमासाठी विमान प्रवसाला जायचे असल्यानं राज्यपालांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळं राज्यपालांना विमानातून खाली उतरावं लागलं. याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेते ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून सरकारची बाजू मांडली आहे.

खासगी कामांसाठी राज्यापालच काय तर मुख्यामंत्री सुध्दा सरकारी विमानाचा वापर करु शकणार नाही. राज्यपाल ज्या पदावर आहेत त्या पदाच्या प्रतिष्ठेची जबाबदारी त्यांना सुध्दा कळाली पाहीजे. तसंच राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?, असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे.

महाराष्ट्र सरकार कार्यालय नियमानेच वागले असून यात वाद घालण्याचे काही कारण नाही. राज्यपाल कोश्यारी हे सन्मानीय व्यक्ती असून भारतीय जनता पक्ष त्यांना त्यांच्या अजेंडावर नाचायला भाग पाडत आहेत हे राज्यपालांनी समजावं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, अहंकारी राजकारण कोण करत आहे हे संपुर्ण देश जाणतोय. दिल्ली सिमेवर दोनशे शेतकरी कष्ट करत असुन कृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही, याला अहंकार नाही तर काय म्हणावं?,असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या