Farmer l राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयांत विमा जाहीर केला होता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांचा तो आनंद सरकारने हिसकावून घेतला आहे. कारण सरकारने गाजावाजा करत शेतकऱ्यांना 1 रुपयांत विमा जाहीर केला होता. मात्र छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला धक्कादायक प्रकार :
राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील अनेक गावांत शेतकऱ्यांना अवघे 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली असल्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात पैसे जमा झाल्याचे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. या प्रकरणानंतर शेतकरी संतप्त झाले आहेत. मात्र घडलेल्या या प्रकराची प्रशासकीय पातळीवरुन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. हा सर्व प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घडला आहे. शेतकऱ्याला १ रुपयात पीक विमा देणार असल्यानंतर शेतकऱ्यांना अवघे 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
या सर्व प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच शेतीमालाला देखील भाव नाही असे असतानाही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. पिकविम्याचे अवघे 70 रूपये शेतकऱ्यांना मिळाले आलेत. मात्र बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत. या सर्व प्रकारामुळे शेतकरी राज्य सरकारवर प्रचंड संतापले आहेत.
Farmer l बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ :
छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने बोलताना सांगितलं की, “पीकविम्याचे केवळ 70 रुपये बँकेत जमा झाले आहेत. मात्र बँक खात्यातले पैसे काढण्यासाठी तब्बल 1000 रुपये बॅलन्स बँक खात्यात ठेवावा लागतो. मात्र आता पीक विम्याचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी 1000 रुपये बँकेत टाकायला कुठून आणायचे असा सवाल देखील शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे.
राज्यात पावसाने देखील दांडी मारली असल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्य सराकरने मोठ्या थाटामाटात चिंतेनं ग्रासलेल्या बळीराजासाठी एक रुपयांत विमा जाहीर केला होता. पण, छत्रपती संभाजीनगरातल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आलेले पैसे पाहून सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी देखील संतप्त झाले आहेत.
News Title – Maharashtra Government Pik Vima Yojana
महत्त्वाच्या बातम्या-
…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?
पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये
देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल