बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवजयंतीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | राज्यात आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून होणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

महाविद्यालयाचं कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली पाहिजे, असा निर्णय आम्ही यापूर्वी घेतला होता. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवातही राष्ट्रगीतानं व्हायला हवी, असंही आमचं म्हणणं होतं.

याबाबतचा आदेश 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने देणार आहोत. याबाबतचं परिपत्रक 19 तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये देण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलंय.

दरम्यान, खुल्या विद्यापीठांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घ्यायची असा निर्णय आज आम्ही दिला, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

दिल्लीकरांनी केली भारतीयांच्या मनातली बात- अवधूत गुप्ते

“थोरातांना मंदी कळते का? ती एका देशातून दुसरीकडे जात नाही”

महत्वाच्या बातम्या- 

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

झेंड्यात राजमुद्रा वापरणं राज ठाकरेंना महागात; राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस!

“आता… शिवसेनेला महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्रपक्ष काँग्रेस?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More