Top News महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?

Photo Courtesy- Facebook/Uddhav Thackeray

मुंबई | महापोर्टलद्वारे महाराष्ट्रात होणारी नोकरभरती वादग्रस्त ठरल्यानंंतर निवड समितीला मदत करण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या राज्यात फक्त ‘अ’ दर्जाची म्हणजेच वर्ग एक आणि वर्ग दोनच्या पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत केली जाते.

ब, क आणि ड वर्गांच्या पदभरतीसाठी दुय्यम सेवा निवड मंडळ महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. महाराष्ट्रात आता नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्वच दर्जाच्या पदांची भरती करता येईल का? याची चाचपणी सुरू आहे.

मूख्य सचिव संजय कुमार यांनी विविध सचिवांची एक बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये या विषयावर चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सचिवांना ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करता येऊ शकते का?, याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

‘एमपीएससी’मार्फत पदभरती करण्याचा प्रस्तावित निर्णय कितपत योग्य आणि उपयुक्त ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ, चालू सामन्यात खेळाडूचा मृत्यु

‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या