मुलीच्या लग्नाची चिंता विसरा, आता सरकार देणार आर्थिक मदत; काय आहे कन्यादान योजना?

Kanyadan yojana

Kanyadan Yojana | प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता लागलेली असते. भारतात लग्नात सर्वाधिक पैसा खर्च केला जातो. एक वडील मुलीच्या लग्नासाठी पै न पै जोडत असतो. लग्नासारखा आनंदी क्षण हा कुण्या कुटुंबाला भार वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कन्यादान योजना राबवली जाते.  सरकारकडून लग्नासाठी कन्यादान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. (Kanyadan Yojana)

अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या विवाहाप्रसंगी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. मागासवर्गीय कुटुंबांचे विवाहावर होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्‍थांना प्रोत्साहन म्हणून शासन ही योजना राबवते.

कन्यादान योजनासाठी पात्रता काय?

वधू व वर महाराष्‍ट्रातील रहिवासी असायला हवेत.
नवदाम्पत्‍यातील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह) असावा, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये.
वधू-वर यांच्‍या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल.
बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्‍या कोणत्‍याही कलमाचा भंग या दाम्पत्य किंवा कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.(Kanyadan Yojana)
जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह असल्‍यास त्यासाठी 30 जानेवारी 1999 च्या शासन निर्णयानुसार कोणते फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील.

मदत किती आणि कशी दिली जाते?

योजनेच्या माध्यमातून नव विवाहित दाम्पत्याला 20000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. (मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेची आर्थिक मदत 25000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. ) ही मदत वधू किंवा वर यांच्या पालकांच्या नावे मंजूर होते. मात्र, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणे बंधनकारक आहे. असे विवाह आयोजित करणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे 4000 रुपये मिळतात.(Kanyadan Yojana)

News Title –  Maharashtra govt Kanyadan Yojana

महत्वाच्या बातम्या- 

तुम्हाला PM किसान निधीचा 18 वा हप्ता घ्यायचायं? तर ही गोष्ट आजच करा

देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय

‘संकेत बावनकुळेसह मित्र…’; नागपूर हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर

विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांत आज जोरदार बरसणार; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

सोलापूरात भाजपला खिंडार?; तब्बल ‘इतके’ नेते शरद पवार गटात जाणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .