बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाचं निदान करणाऱ्या चाचणीचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे होते. आयसीएमआरनं निश्चित केलेले ४५०० हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्क्यांनी कपात करत खासगी लॅबला दणका दिला आहे.

आयसीएमआरनं सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीनं करोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता. त्यानंतर सरकारनं दर निश्चित केले.

खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी 4,500 रुपये इतके होते, ते आता 2200 रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास 2200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2800 रुपये शुल्क असेल, असं टोपेंनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी वाढदिवसादिनी आदित्य ठाकरेंकडून ‘लाख’मोलाची मदत!

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसादिनी रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट…

महचत्वाच्या बातम्या-

‘मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…’; कपिल सिब्बल यांचा मोदींना टोला

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

“तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More