बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री

मुंबई | कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपुर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केलं. लॉकडाऊनही करूनही देशात कोरोना व्हायरस वाढत असल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील 2000 विद्यार्थी राजस्थानमधील कोटो येथे अडकले आहेत.  या विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने आता पाउलं उचलली आहेत. या संदर्भातील माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

कोटा येथून विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकार  100 एसटी बस सोडणार आहे.  या विद्यार्थ्यांना परत आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार असल्याचं परब यांनी सांगितलं आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी 100 एसटी बस सोडण्यात येणार असून एका एसटीमध्ये दोन चालक असणार आहेत. लांबचा प्रवास असल्याने एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक असणार आहे, अशी माहिती समजली आहे.

दरम्यान, आयआयटी मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये असतात. यावेळी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे 2000 विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More