बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या 10 शहरांपैकी 9 शहरं महाराष्ट्रातली, केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये!

नवी दिल्ली | सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोना फोफावत चालला आहे, त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदी तर काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढता चालली आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितल्यानुसार देशातील महाराष्ट्र आणि पंजाब दोन राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या टॉप-10 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या 9 शहरांचा समावेश असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला आणि राज्याबाहेरील बंगळुरू शहर देखील आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे, असं राजेश भूषण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये सुद्धा दिवसाला 1500 ते 1700 रूग्ण सापडत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. तर मध्य प्रदेशामध्ये भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

संजय राऊतांच्या घरी मेजवानी, भाजप नेत्यांनाही जेवणाचं निमंत्रण!

…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात आता फक्त ‘TATA SAFARI’च दिसणार!

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

पोलीस हफ्ते कसे वसूल करतात?; आमिरच्या कार्यक्रमातील IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More