मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आलीये. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण कधी पाहिलं नसल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
अनिल देखमुख यांच्या सांगण्यानुसार, “भाजप नेत्यांच्या किंवा त्यांच्या धोरणांविरोधात जे कोणी बोलेल त्यांच्या मागे ईडीची तसंच सीबीआयची चौकशी लावायची. ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचाच अधिकार आहे. या गोष्टीचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाहीये.”
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावलीये. ही पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस धाडण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
थोडक्यात बातम्या-
मोठ्या विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न; अहमदनगरमधील स्तुत्य घटना
अक्षय कुमारने वाढवलं मानधन; एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ रूपये
“मी जर तोंड उघडलं तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील”
‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण
रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…