बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांच्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही”

मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षाचे पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचाही समावेश आहे. संजय काकडे यांनी फेसबुक पोस्ट लिहित फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होताच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आणि महाराष्ट्राला निर्णयक्षम, विकासाभिमुख, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आणि शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत महाराष्ट्राची नवनिर्मिती आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात केला. जात, धर्म, पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन केलेल्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही, असं संजय काकडे यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अफाट निर्णय क्षमता असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्णयक्षम व विकासाभिमुख सरकार काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचे अभूतपूर्व असे 57 मोर्चे आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात निघाले. कोट्यावधी मराठा समाज रस्त्यावर आला होता. महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार होते. त्यामुळे ही आंदोलनं, मोर्चे सरकारच्या विरोधातच होती. या आंदोलनाविषयी आकस न बाळगता तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला, असंही संजय काकडेंनी म्हटलंय.

महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु, एकानेही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाहीत. फडणवीस साहेबांनी मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. ते खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत, असंही संजय काकडे म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More