महाराष्ट्र मुंबई

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रात आतापर्यंत 42 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 800 टेस्ट  झाल्या आहेत. त्यापैकी 42 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. अद्याप काही रिपोर्ट येणे बाकी आहे. पण जे परदेशवारी करुन आले आहेत, त्यांचीच सध्या चाचणी केली जात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सरकारी कार्यालयातही 50 टक्केपेक्षा कमी कर्माचाऱ्यांनी ऑफिसमध्ये काम करावे याबाबतचा निर्णय लवकर घेणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट अर्थात सार्वजनिक वाहतूक कमी होईल. जर नागरिकांनी ऐकलं नाही तर कठोर निर्णय घेऊ, असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद, धुळे, मिरज, सोलापूर या ठिकाणी नव्या लॅब सुरु करण्याला प्राधान्य आहे. तिथे कोरोना चाचणी करण्याची सोय उपलब्ध करणार असल्याचं टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, आज पुण्यात एका महिलेला कोरोना लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यांमुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19वर गेल्याचं समजत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण

महत्वाच्या बातम्या-

अमिताभ बच्चनही आयसोलेशनमध्ये, हातावर BMCचा ‘शिक्का’

कोरोनामुळे पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या