बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 मेपर्यंत राज्यात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत- राजेश टोपे

मुंबई | केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र 3 मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउन हा कदाचित 3 मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहिल. 3 मे नंतरच याबाबतीतला निर्णय होईल. मी कदाचित अशासाठी म्हणतो आहे की 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतीलच, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश जारी करत काही व्यवहारांना सूट दिली. मात्र असा कोणताही राज्य सरकारने घेतलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More