महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake l राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज पहाटे झालेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मराठवाड्यात जाणवले भूकंपाचे धक्के :

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील हिंगोली, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील व विदर्भातील झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या धक्कादायक घटनेमुळे भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही वेळेसाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले. मात्र कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात जाणवले होते भूकंपाचे धक्के :

गेल्या सोमवारी देखील संध्याकाळी 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात होते. ISR ने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील दुधईपासून 10 किलोमीटर अंतरावर होता. ISR नुसार, “भूकंपाची नोंद संध्याकाळी 4:10 वाजता करण्यात आली आणि तो 30 किलोमीटर खोलीवर होता. या महिन्यात राज्यातील सौराष्ट्र-कच्छ भागात तीनपेक्षा जास्त तीव्रतेचा हा तिसरा भूकंप आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते.

News Title – Maharashtra Hingoli Earthquake News

महत्त्वाच्या बातम्या-

आज ‘या’ 2 राशींचे नशीब पालटणार!

टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच; ‘या’ माजी खेळाडूवर टाकली संघाची जबाबदारी

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!

स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांची जळजळ होतेय?, ‘या’ उपयांनी मिळेल आराम

“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री..”; वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य