बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

मुंबई | अभिनेता सोनू सूद याच्या कार्यावर शिवसेना नेता संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देशमुख यांनी सोनू सूदच्या कामाची स्तुती केली आहे.

संजय राऊत यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही. पण कोरोनाविरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. सोनू सूद यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच मी अभिनंदन करतो, असं म्हणत देशमुख यांनी सोनू सूदचं कौतुक केलं आहे.

मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली आहे.

दरम्यान, सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारचा दणका; विनाकारण भीती दाखवून अ‌ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

“एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून समोर येतोय”

आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय- सुधीर मुनगंटीवार

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, तर…- गिरीश महाजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More