बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

मुंबई | दहावीच्या निकालानंतर आता सगळ्यांचं लक्ष बारावीच्या निकालाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता बारावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.

जुलैअखेरपर्यंत निकाल लागणार होता त्यामुळे आज निकाल लागणार असं सगळ्यांना वाटत होतं मात्र आता इयत्ता 12 वी राज्य बोर्ड निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं समजतंय. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार असून अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पूर आला असल्यानं तेथील बोर्डाचे प्रशासकीय काम बाकी राहिलं आहे. त्यामुळे बारावीचा निकाल थोडा उशीरा लागणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, यावर्षी महाराष्ट्र एचएससी परिक्षा 2021 साठी साधारण 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर!

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

पुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, ते आमच्या मागण्या नक्की पुर्ण करतील”

‘माफी मागून, 25 कोटींची भरपाई द्या’, शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात हायकोर्टात धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More