IMD Update l राज्यात यंदाच्यावर्षी मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने यावर्षी पाऊस 106% पडणार असल्याचे वर्तवले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून विदर्भात पावसाने दांडी मारली होती. मात्र आजपासून पुन्हा एकदा विदर्भात पाऊस सक्रिय झाला आहे. अशातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स दिली आहे.
विदर्भासह मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता :
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाचे वातावरण दिसत आहे. हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
वाशिम जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी झालेल्या हळद, कपाशी या पिकांना चांगला आधार मिळाला असल्याचे बोलले जात आहे. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
IMD Update l मुंबईकारांवर पाणीसंकट ओढवू शकते :
राज्यातील नांदेड जिल्हा अद्यापपर्यंत पावसापासून वंचित राहिला आहे. कारण नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 35 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. तसेच मुंबईला पाणी पुरवठा कारणाऱ्या भातसा धारणमध्ये देखील 22.5 % पाणीसाठा शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. कारण शहापुरतील धरण क्षेत्रात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. तसेच धारण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणी पाणीसाठा कमी झाला आहे. याशिवाय याठिकाणी 10 ते 12 दिवस पाऊस झाला नाही तर मुंबईकारांवर पाणीसंकट ओढवू शकतो.
काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. त्यानंतर 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. तसेच 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
News Title – Maharashtra IMD Update
महत्त्वाच्या बातम्या
ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…
महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा
…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी
दान करते वेळी ‘या’ गोष्टी ठेवाव्या लक्षात, नाहीतर लागाल भिकेला