बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  कोरोना राज्यात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोेदींनी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं.

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही मोदींचे आभान मानले. याआधी मुख्यमंत्र्यांनी  कोरोना लसीकरणासाठीच्या को-विन अॅपमधील त्रुटींबाबत एक पत्र मोदींना लिहिलं होतं. त्यामध्ये को-विन अॅमध्ये त्रुटी असल्याने राज्याला नवीन स्वतंत्र अॅप विकसीत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती.

या पत्रानंतर मोदींनी उद्धव ठाकरेंना फोन करत महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी बोलताना,  महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं, अशी विनंती ठाकरेंनी मोदींना केली. त्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने कशा प्रकारे नियोजन केलं आहे याबाबतची माहितीही मोदींनी दिली.

दरम्यान, लसीकरणासंदर्भातील राज्य सरकारच्या स्वतंत्र अॅपसाठीच्या मागणीवर पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणती भूमिका घेतली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

थोडक्यात बातम्या- 

हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल, महिला वेटरनं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

…तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल- चंद्रकांत पाटील

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही- राहुल गांधी

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणार का?

ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या वृद्ध महिलेनं युवकासाठी सोडला स्वतःचा बेड, म्हणाल्या….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More