“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”
मुंबई | राज्याचं वादळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक हालचालींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला असून दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे.
आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी ट्विट करत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे, असा खोचक सवालही निलेश राणेंनी विचारला आहे. राणेंच्या या ट्विटची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे.
थोडक्यात बातम्या –
“कुणी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकणार”
“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….
विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आणि गाराही पडणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मोठी बातमी! रशियाची ‘ही’ अट युक्रेनला मान्य
Comments are closed.