बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

मुंबई | शिवसेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजून सुरूच आहेत. अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असताना ‘राज्य तुळशीचे रोप आहे, त्यात भांग लावण्याचा प्रयत्न करू नका’ असा इशारा राऊतांनी भाजपला दिला. तसंच, दिल्लीतल्या डोमकावळ्यांनी कितीही आरोप केले तरीही पाठीचा कणा अजून शाबूत आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा दावा केला जातोय. याला शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव सोसण्याची तयारी असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राला तुळशीचे वृंदावन संबोधत इथं गांज्या आणि भांग पिकवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत पण ते शक्य नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

सरकारी यंत्रणांचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असंही राऊत यावेळी म्हणाले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे कितीही छापे टाकले तरीही आम्ही ठाम आहोत. माझ्यावर कितीही वार केले तरी माझ्या पाठीचा कणा ताठ आहे आणि मन खंबीर आहे, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले.

मी जिथं राहतो तिथं चांगल्या प्रकारचे मोर आहेत, माझ्या बाजूला डोमकावळे फडफडताना मी पाहतो. ते किती फडफडले तरीही त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही, असा खोचक टोला लगावला. हे सरकार पाच वर्ष टीकणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गांधी कुटुंबीय यांचे म्हणणे आहे आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केले, तर 25 वर्ष हे सरकार हलणार नाही, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.

थोडक्यात बातम्या-

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More