बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

मुंबई | आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म दिवस असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच मराठी नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्यात असलेल्या गुणांचंही कौतुक केलं आहे. राज ठाकरे हा राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे. संगीत, चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नसल्याचंही केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

वाढदिवस साजरा करून वय वाढतं, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत. या कोरोनाच्या काळातही राज ठाकरे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलंय आणि ते आपण मान्य करायालाच हवं, असंही ते म्हणाले.

एवढं असूनही राज ठाकरे यांना आपल्या राजकीय क्षेत्रात अजूनही यश मिळालेलं नाही. राज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र फार वेगळा आहे. एकदा त्यांच्या हातात महाराष्ट्र राज्य देऊ. नक्कीच आपल्यावर ‘राज्य’ येणार नाही. याची ते काळजी घेतील, असा विश्वास केदार शिंदेंनी व्यक्त केला आहे. तसेच आपण त्यांच्या या वाढदिवसाचं गिफ्ट त्यांना पुढच्या निवडणूकीमध्ये मनसेला मतदान करून देऊ, असंही केदार शिंदेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

जुन्या परंपरेला फाटा देत पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा; लाडक्या बाबांना पोरींचा अखेरचा निरोप

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More