बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

उस्मानाबाद | महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून गेली कित्येक वर्ष मराठी- कानडी वाद सुरू आहे. शासकिय कार्यालयापेक्षा रस्त्यावर हा वाद जास्त पेटताना दिसतो. त्यामुळे सीमाभागात नेहमी तणावाचं वातावरण राहिलं आहे. या सर्व वादात शिवसेनेने नेहमी मराठीचा मुद्दा लावून धरत कर्नाटकला विरोध केला आहे. आता पुन्हा शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आल्याचं चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाके उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला आहे. उमरगा मतदार संघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निर्देशानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आता सीमा भागात तणावाचं वातावरण तयार झालं आहे. तर गावकऱ्यांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आहे.

शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने आगामी काळात या भागात वाद पेटणार आहे. सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे केले आहेत, असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, सीमा नाके हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात. मात्र, कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्याने कायमस्वरूपी सीमा तपासणी नाके उभे करण्यात येणार असल्याची माहिती खासगी भागात पाहणी करताना गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन?- खासदार संभाजीराजे

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More