बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 845 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 730 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 17 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 9 हजार 799 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 29 हजार 875 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 75 हजार 682 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 739 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 46 लाख 87 हजार 403 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

पुण्याच्या महापौरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इथं’ ठरले लखपती!

“केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोप्प वाटतं का?”

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More