महाराष्ट्रात चाललंय काय?; अहिल्यानगरमधील शिवजयंती मिरवणुकीतील धक्कादायक प्रकार समोर

Maharashtra Lawrence Bishnoi Posters Displayed in Shiv Jayanti

Maharashtra | अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवजयंती मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोईचे (Lawrence Bishnoi) फलक दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरमधील शिवजयंती कार्यक्रमात ही घटना घडली. शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसोबत कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकावले आणि गाण्यावर नाचवले. या घटनेमुळे सोशल मीडियावर (social media) चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra)

मिरवणुकीत गँगस्टरचे फलक

पाठीमागील बाजूस भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचा फोटो असलेले हे फलक होते. संभाजीनगरमध्येही असाच प्रकार घडला. स्वातंत्रवीर सावरकर, नथुराम गोडसे यांच्यासह नितेश राणे आणि लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले पोस्टर्स (posters) डीजेच्या तालावर नाचवण्यात आले. बिश्नोईच्या फलकावर ‘आय एम ए हिंदू, एमॅड ए मॅड’ असे लिहिले होते.

सार्वजनिक निवडणुकीत अशा प्रकारे गुंडाचे फोटो झळकवण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गांधी द्वेष लिहिलेल्या एका पोस्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकला. “आम्ही गांधीला नाही, तर शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि महाराणा यांच्यासारख्या धुरंधरांना मानणारे आहोत,” असे या पोस्टवर लिहिले होते.

गुन्हेगारांचे उदात्तीकरण कितपत योग्य?

गणेशोत्सवातील मिरवणुकांमधील वाद लक्षात घेऊन पोलिसांनी फलक लावण्यास बंदी घातली होती. तरीही, कुख्यात गुंडाचे फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्यामुळे, त्यांच्या मावळ्यांनी गुन्हेगारांचे पोस्टर झळकवणे कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला जात आहे.

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता. अशातच, समाज माध्यमांचा वापर करून ही टोळी महाराष्ट्रात हातपाय पसरवत आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सुमारे ७०० सदस्य असल्याची माहिती आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड आणि गुजरात या ११ राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंड सक्रिय आहेत. लहान मुले सोशल मीडियाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.  (Maharashtra)

Title : Maharashtra Lawrence Bishnoi Posters Displayed in Shiv Jayanti Processions in Ahilyanagar and Sambhajinagar

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .