बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम देशातील सर्वाधिक असल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. त्याबरोबरच सध्या महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. लसीकरण मोहिमेत सुरुवातीपासूनच महाराष्ट्र अग्रेसर होता.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रात आजपर्यंत 2 कोटी 7 हजार 70 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण केंद्र सरकारतर्फे मोफत केलं जाईल, असं काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधून जाहीर केलं. त्यानंतर खाजगी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या त्यांच्या किमती देखील आता निश्चित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने महाराष्ट्र राज्याचं याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा लसीकरणाच्या बाबतीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 2 कोटी 15 लाख 65 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये 1 कोटी 91 लाख 88 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

कोरोना लस घेतल्यावर बेशुद्ध झाला व्यक्ती अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

अनाथांना 1 टक्के आरक्षण मिळणार?; आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

‘ही’ लक्षणं दिसताच व्हा सावध ‘हा’ फंगस फुफ्फुसांपर्यंत पोहोचत तयार करतोय लंग बॉल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More