बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ दिवसापासून सुरू होणार विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण,  कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या महिन्यात 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशनामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी  RT-PCR कोरोना चाचणी करावी लागणार आहे. ही चाचणी 3 ते 4 जुलै रोजी विधानभव मुंबई येथे पार पडणार आहे.

अधिवेशनात आसनव्यवस्था ही एका आसनावर एकाच सदस्याला बसता येणार असून प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच सदस्यांना एक किट, एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझर देण्यात येणार आहे. अधिवेशनावेळी विधानभवनात मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही.

दरम्यान, अधिवेशन फक्त दोन दिवस ठेवल्यामुळे विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

शिवसेना-भाजप युतीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

विजय शिवतारेंच्या मुलीचे खळबळजनक आरोप, फेसबुक लाईव्हद्वारे आईचं प्रत्युत्तर

तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही-धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More