महाराष्ट्र सोलापूर

कोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी

सोलापूर | अक्कलकोट, सांगोला, अकलूज, मोहोळ आणि बार्शी इत्यादी तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी बार्शीतल्या वैराग तालुक्यातील एका किराणा दुकानदाराचे कोरोना अहवाल पुण्यात गेल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे वैराग तालुक्यातील संपर्कात असलेल्या लोकांची तपासणी सुरु आहे. अशाप्रकारची चिंताजनक परिस्थिती असताना शासकीय अधिकारी मात्र चक्क मद्य पार्टी करताना रंगेहात सापडले आहेत.

काल गुरुवारी वैराग ग्रामपंचायत कार्यालयात मद्य पार्टी रंगली होती. ग्रामपंचायत प्रशासनातील वैरागचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर आणि त्यांचे इतर 3 सहकारी मद्य पार्टी करत होते.

हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी कार्यालय गाठलं. त्यावेळी कार्यालयात पार्टी करणाऱ्या चौघांना त्यांनी रंगेहाथ पकडलं. हा सगळा प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेरात टिपला. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणाची पोलिसांना तात्काळ दखल घेतली. शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच जिल्ह्यात दारूबंधी असताना शासकीय आस्थापनेत मद्य प्राशन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार

‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार

मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या