मुंबई | आजपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरूवात झालीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफीची प्रमाणपत्र वाटली.
‘आपले सरकार’ वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या यादीचंही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ही कर्जमाफी दिली जातीय.
सुरूवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा दावा सरकारनं केलाय. रोज 2 ते 5 लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत.
Comments are closed.