बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लाॅकडाऊनची घोषणा केली होती. सध्या महाराष्ट्रात 1 जून पर्यंत लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. 1 जूननंतर लाॅकडाऊन उघडणार का? असा प्रश्न सध्या सर्वांना पडलेला आहे. यावर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आला असला तरी लगेचच सर्व काही उघडणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी बोलुन दाखवलं आहे. महाराष्ट्रातील लाॅकडाऊन हळुहळु उघडावा लागेल, कोरोनाची परिस्थिती पाहुन निर्णय घेतला जाईल, मागच्या वेळी लाॅकडाऊन उघडल्यानंतर आकडे वाढले तसं यावेळी होऊ नये. असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत आणि रेड झोनमधील जिल्ह्यांना कडक लाॅकडाऊनची गरज असल्याचं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं होतं. परंतु, महाराष्ट्रातील रूग्णसंख्या आटोक्यात आली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा हळुहळु कमी होत आहे आणि येत्या 7 दिवसात मुंबईतील संपुर्ण लसीकरण पुर्ण करू, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करत आहे, ते त्यांना करू द्या, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील लाॅकडाऊन हळुहळु टप्प्याटप्याने उघडेल, असे संकेत सध्या मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

‘सर माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’; नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुलगी हवी होती, मुलगा झाला; रागाच्या तडाख्यात दगडावर आपटून हैवान बापाकडून मुलाची हत्या!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More