महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

Maharashtra Lok Poll Survey | महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अशात एक सर्वे समोर आला आहे. यामुळे सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या नेत्यांची झोप उडणार आहे.

विधानसभा निवडणुकीत, विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील NDA चा राजकीय पराभव करू शकतो. विधानसभेला महाविकास आघाडी बाजी मारेल, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर

लोक पोलच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समोर आलंय की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 38-41 टक्के असू शकतात. विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला 141-154 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 41- 44 टक्के असू शकतात.

महाराष्ट्रावर झालेल्या लोकनिवडणुकीच्या ग्राउंड सर्व्हेनुसार, इतरांना तेथे पाच ते 18 जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी 15 – 18 टक्के असू शकते.

सर्वेक्षणात नेमकं काय?

पहिला झोन विदर्भ आहे. इथे 62 विधानसभा निवडणुकीच्या जागा आहेत. तिथे महायुतीला 15 ते 20, महाविकास आघाडीला (MVA) 40-45 आणि इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात, असं समोर आलं आहे. तिथे लोकांचा कौल काँग्रेसच्या बाजूनं झुकल्याचं पाहायला मिळालं.

दुसरा झोन खान्देश असून तिथे राज्यातील विधानसभेच्या 47 जागा आहेत. तिथे सत्ताधारी महायुतीला 20-25, महाविकास आघाडीला 20-25 आणि इतरांना शून्य ते दोन जागा जिंकता येतील. खान्देशातील एसटी पट्टा MVA ला पाठिंबा देत आहे. तिसरा झोन म्हणजे, ठाणे-कोकण. या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत. तिथे एनडीएला 25-30 जागा मिळू शकतात, एमव्हीएला पाच ते 10 जागा आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात.

चौथा झोन मुंबई आहे. या भागांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. सत्ताधारी महायुतीला 10 ते 15, महाविकास आघाडीला 20 ते 25 आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळू शकते. मुंबईत उच्चभ्रू विरुद्ध मध्यमवर्गीय असा निवडणुकीचा मूड असतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडे मुंबईतील सर्व मराठी मतं पाहायला मिळेल. तर काँग्रेसला मुस्लिम वोटबँकचा फायदा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य समोर; दिया मिर्झाचा मोठा खुलासा

मुलीच्या लग्नाची चिंता विसरा, आता सरकार देणार आर्थिक मदत; काय आहे कन्यादान योजना?

तुम्हाला PM किसान निधीचा 18 वा हप्ता घ्यायचायं? तर ही गोष्ट आजच करा

देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय