Loksabha Election l महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील एकूण 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. आज मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या जागांवर मतदान पार पडत आहे.
पाचव्या टप्प्यातील ‘या’ प्रमुख उमेदवारांवर लक्ष :
महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे. . पाचव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज महाराष्ट्रात 13 जागांवर मतदान होत आहे. याआधी चार टप्प्यात 48 पैकी 35 जागांवर मतदान झाले आहे. अशातच दक्षिण मुंबईसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या उबाठामधून अरविंद सावंत रिंगणात आहेत. यामिनी जाधव या शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने अफजल शब्बीर अली दावूदानी यांना उमेदवारी दिली आहे.
Loksabha Election l पाचव्या टप्प्यात कोणत्या उमेदवाराची स्पर्धा कोणाशी होणार? :
1- मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
2- मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
3- मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उबाठा) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना)
४- मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना उबाठा)
5- मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना उबाठा)
6- मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उबाठा) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)
7- कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उबाठा) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
8- ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उबाठा) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना)
9- भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
10- पालघर: हेमंत सवरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना उबाठा)
11- धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
12- दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) विरुद्ध डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप)
13- नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना उबाठा)
News Title – Maharashtra Lok Sabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या