Maharashtra Loksabha Election | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Maharashtra Loksabha Election) राज्यातील 10 हायहोल्टेज लढतीत कोण मारणार बाजी हे लवकरच समजेल. मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे. अनेकांचं लक्ष हे लोकसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Loksabha Election) निकालाकडे लागलं आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज असलेली लढत ही सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. याकडे केवळ राज्याच नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Loksabha Election)
राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती
कोकण विभागातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठीत असलेली राज्यातील दुसरी लढत ही भाजपचे नेते नारायण राणे विरूद्ध ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यात लढत होताना दिसली. दोन्ही उमेदवार तुल्यबळ होते. मात्र एक्झिट पोलनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचं नाणं खणखणीत वाजेल अशी चर्चा आहे. हे आता आज काही तासानंतर लवकरच समजेल. (Maharashtra Loksabha Election)
शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने आयात केलेले उमेदवार शिवाजी आढळराव पाटील विरूद्ध अमोल कोल्हे यांच्यात नुकतीच लढत झाली. दोन्हीही अगदी महत्त्वाचे उमेदवार आहे. एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचं आव्हान दिलं होतं. यामुळे ही लढत प्रतिष्ठेची असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र एक्झिट पोलनुसार शिरूरमधून अमोल कोल्हे विजयाची तुतारी वाजवतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील ही तिसरी महत्त्वाची लढत आहे.
अंतिम सहा महत्त्वाच्या जागा
तसेच राज्यातील चौथी महत्त्वाची लढत ही दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरूद्ध यामिनी जाधव यांच्यात आहे. दक्षिण मुंबईचा विचार केल्यास अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तर यामिनी जाधव या शिंदे गटाच्या नेत्या आहेत. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. तर पाचवी महत्त्वपूर्ण लढत ही संजय मंडलिक (शिंदे गट) विरूद्ध छत्रपती शाहू महाराज यांच्यात लढत सुरू झाली. तसेच सहावी महत्त्वपूर्ण लढत ही सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे विरूद्ध शशिकांत शिंदे यांच्यात चुरस रंगली आहे.
सातवी लढत चुरशीची लढत ही माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून धोर्यशील मोहिते पाटील विरूद्ध भाजपचे नेते रणजितसिंह निंबाळकर. तसेच आठवी लढत आणि शेवटची लढत ही दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे विरूद्ध निलेश लंके यांच्यात लढत झाली. तसेच नववी लढत ही सोलापूर येथे प्रणिती शिंदे विरूद्ध राम सातपुते यांच्यात लढत आहे. सर्वात गाजलेली लढत ही पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर विरूद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात झाली.
News Title – Maharashtra Loksabha Election Top 10 High Voltage Fights
महत्त्वाच्या बातम्या
आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार
मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार
शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे
भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर
हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर