Loksabha Result l अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कालजाहीर झाला आहे. या निकालाला अनेक दिग्गज नेत्यांचं सव्वापण धुळीस मिळालं आहे, तर कित्येक नेत्यांची खासदारकी पदी वर्णी लागली आहे. अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यात 45 प्लस खासदार पूर्ण करण्याचं स्वप्न अधीर राहील आहे.
राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? :
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेस पक्षाने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा सर्वाधिक मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला तब्बल पाच जागा मिळाल्या आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजेच 30 जागा मिळाल्या असून त्यामध्ये 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना तब्बल 9 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना अवघ्या 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या असून त्यापैकी 8 जागांवर मोठा विजय मिळवला आहे.
Loksabha Result l किती आहे महाराष्ट्रातील पक्षांचा स्ट्राईक रेट?
भाजप
28 पैकी 9
स्ट्राईक रेट – 33.33 टक्के
शिवसेना (शिंदे गट)
15 पैकी 7 जिंकल्या
स्ट्राईक रेट – 46.30 टक्के
राष्ट्रवादी (अजित पवार गट)
4 पैकी 1 जिंकली
स्ट्राईक रेट – 25 टक्के
शिवसेना (ठाकरे गट)
21 पैकी 9 जिंकल्या
स्ट्राईक रेट – 42.85 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
10 पैकी 8 जिंकल्या
स्ट्राईक रेट – 80 टक्के
काँग्रेस
17 पैकी 13 जिंकल्या
स्ट्राईक रेट – 76.47 टक्के
News Title : Maharashtra Loksabha Result
महत्त्वाच्या बातम्या-
या राशीच्या व्यक्तींना पराभवातून सावरावे लागेल
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, बजरंग सोनवणे विजयी
मराठवाड्यात फक्त जरांगे फॅक्टर, बघा कुणाकुणाचा काढला घाम!
बीडमध्ये आता नवा ड्रामा सुरु! पंकजा मुंडेंची विजयाची आशा पल्लवित, बजरंग सोनवणेंची धाकधूक वाढली
बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, आता शरद पवारांनी घेतली एन्ट्री… पोलिसांना थेट…