बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊनच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊनचे संकेत दिले, त्यानंतर लाॅकडाऊनच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात भाजपने लाॅकडाऊनला कडाडुन विरोध केल्यानंतर सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीनेही विरोध करत महाराष्ट्रात लाॅकडाऊन गरजेचा नसुन आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं बोलुन दाखवलं होतं. तसेच ‘आयसीएमआर’च्या नियमाप्रमाणे 15 दिवसांचा लॉकडाऊन कोरोनाची पूर्ण साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं.

महाराष्ट्रात मर्यादित स्वरूपात लाॅकडाऊन लावण्यात यावा तसेच त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांनी तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्यानंतर आता 2 एप्रिलपासुन महाराष्ट्रात मर्यादित स्वरुपाचा लाॅकडाऊन लावण्यात येऊ शकतो. नवीन नियम लागू करून हा लाॅकडाऊन केला जाऊ शकतो. ज्यामध्ये गर्दीची ठिकाणं ही पुर्णपणे बंद केली जातील. ज्यामध्ये वेळ घालवण्यासाठी जात असलेल्या विविध जागांचा समावेश असु शकतो.

एका विशिष्ट वेळेत अन्नधान्याची दुकानं उघडी ठेवली जाऊ शकतात, जिल्ह्याच्या सिमा सुरूवातीला बंद केल्या जाणार नाही पण, परिस्थिती खराब झाल्यास तो ही निर्णय घेतला जाऊ शकतो आणि नविन लाॅकडाऊन हा आधीच्या लाॅकडाऊनपेक्षा वेगळा आणि अर्थव्यवस्थेला फटका बसेल असा न करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय हा लाॅकडाऊन सुरूवातीला 7 ते 8 दिवसांसाठी लागु केला जाऊ शकतो, अशी माहीती मिळत आहे.

नाईट कर्फ्यु लावुन काही शहरांमध्ये कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आता दिवसा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत कर्फ्यु लागण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा वाहतुक बंद केल्यास त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होईल म्हणुन सरकार त्यादृष्टीने विचार करून निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच आता रेल्वे स्टेशन, बस-स्थानक, विमानतळ या ठिकाणी कोरोना चाचण्या करून कोरोनाबाधित रूग्णांना त्वरीत वेगळं करून कोरोनाची साखळी तोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच या सर्व गोष्टींचा खुलासा होईल, त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

भारताच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; मोदींनी फोनवरून दिला ‘हा’ सल्ला

अॅम्बुलन्सचं स्पीड इतकं की, व्हिडीओ पाहून लोकंही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…

पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! – रोहित पवार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More