मुंबई | राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वत: ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणं शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?
‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस
चिंताजनक! मुंबईतील ‘या’ भागांमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना
‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद