शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon Update l बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण मान्सून दिवसेंदिवस पुढे ढकलत आहे. अशातच आता राज्यातील बळीराजांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अपडेट्स दिली आहे.

पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार :

हवामान विधाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात तूफान पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 4-5 जून पावसाच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी केरळमध्ये मान्सून वेळेअगोदरच दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच मुंबईमध्ये वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे ठाणे व पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता आहे.

Monsoon Update l या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी :

महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आता कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच या दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 ते 4 जून दरम्यान वादळी वारे व गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात प्रशासनाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. तसेच या काळात सिंधुदुर्गमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून राज्यात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.

News Title – Maharashtra Monsoon Update

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ

आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल

‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ

कुठे ऊन, कुठे पाऊस; वाचा हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…