मुंबई | कोरोना वायरसने सध्या सर्व जगभरात थैमान घातलं आहे. दिसेसेंदिसव कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालये त्यासोबत मंदिरेही बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठं, सर्व प्रसिद्ध मंदिर त्यासोबत सर्वांच्या लाडक्या विठुरायाचंही मंदिर प्रशासनाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे भाविकांना त्याचं श्रद्धास्थान असलेल्या देवाचं दर्शन घेता येत नाय्ये. असं असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं दर्गा बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात 10 ते 11 तास खुला ठेवण्यात येत होता. आता मात्र, केवळ 4 ते 5 तास खुला ठेवण्यात येणार आहे. नमाझ पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असं आवाहन ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी केलं आहे.
दरम्यान, दर्ग्याला देश-विदेशातील हजारो नागरिक दररोज भेट देतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोना व्हायरसची भीती असताना हाजी अली दर्गा बंद न ठेवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल
पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे दीड लाख मास्क वाटप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती
महत्वाच्या बातम्या-
कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव; दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा
खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय
Comments are closed.