नागपूर | नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या नदीम खान या युवा संशोधकानं नैसर्गिक पद्धतीनं पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे.
आपण घराबाहेर असल्यावर आपल्याला शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून हे जगातील सर्वात लहान वॉटर फिल्टर असल्याचा दावा नदीम खानने केला आहे.
पाणी शुद्ध करून ते पिण्यायोग्य करणारं, खिशात मावेल अशा ब्ल्यू मिनरल वॉटर फिल्टरचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे याची विविध स्तरांवर चाचणी झाली असून इंडियन स्टॅण्डर्ड असोसिएशनने याला प्रमाणित केलं आहे.
दरम्यान, कुठल्याही बाटलीला फिट होईल, असं हे यंत्र आहे. बाटलीत कुठलंही पाणी घेऊन हे यंत्र बाटलीच्या समोर लावायचं. बाटलीतून पाणी ग्लासमध्ये घेतल्यावर ते शुद्ध स्वरूपात मिळतं.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह नाशिकच्या पैलवानांचा इंदोरीकरांना पाठिंबा
“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होणार अन् खाणारा पुरूष…”
महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का!; भाजपचा ‘हा’ नेता शिवबंधन बांधणार
अबब! पोलीस फौजदारीनं केली 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी
“भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत”
Comments are closed.