बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

पुणे | कोेरोनाच्या महामारीनं लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. मात्र आता ही परिस्थिती आटोक्यात येत असल्याची पहायला मिळत आहे. त्यामुळे निर्बंधांमध्येही शिथिलता केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिरंही खुली करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली आहे. यातच आता पुण्यात या मुद्यावरुन आंदोलन पुकारण्यात आली आहे.

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. हे आंदोलन श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर केलं. मागील दीड वर्षांपासून हिंदू, मुस्लिम यांसह सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे आतापर्यंत बंद आहेत. नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च इतर सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे राज्य सरकारनं भाविकांसाठी खुली करावी यासाठी हे आंदोलन केलं जात आहे.

तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर पक्षातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. या आंदोलनात पुढील आठ दिवसात मंदिरं उघडली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. मंदिरं खुली करण्यात आली नाहीतर स्वतः जाऊन मंदिरं उघडणार, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय.

दरम्यान, मंदिरं खुली कऱण्यात यावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असलेली पाहायला मिळत आहे.  राजकीय नेत्यांना सभा, यात्रा या गोष्टीला परवानगी मिळते. राजकीय नेत्यांना सभा, यात्रा या गोष्टीला परवानगी मिळते. दुकानही उघडण्यास परवानगी आहे. मात्र मंदिरं उघडण्यास गेल्या दीड वर्षांपासून बंदी घातल्यनं राजकीय पक्ष ही मागणी करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –  

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

पुलावरुन जाताना गाडीने घेतला टर्न अन् झालं भलतच; पाहा व्हिडीओ

“…तर लहान मुलांचं जास्त नुकसान होऊ शकतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More