पुणे | पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अचानक स्थगित करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भारतीताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. अनेक ठिकाणी आवाज बंद झाले. महाराष्ट्रात शेतकऱ्याचा ऊस घेतला नाही म्हणून आत्महत्या केली. आपल्या थंड बसण्यामुळे इथे अनेकांनी राज्य केलं. आम्ही सतत बेसावध राहत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
लाऊड स्पीकरचे भोंग्याचं आंदोलन हे एक दिवसाचं नाही. आता सुरू केलं आहे ना एकदाचा तुकडा पाडून टाका, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मी तुम्हाला एक पत्र देणार आहे. प्रत्येक घरामध्ये हे पत्र पोहोचलं पाहिजे. भोंग्याच्या प्रकरणामुळे जवळपास 28 हजार नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जो कायदा पाळा सांगतो त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. अनेक हिंदू पोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण
‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले
माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू
‘माझ्यासोबत सेक्स केला तर…’; एलोन मस्कवर एअर होस्टेसने केला होता गंभीर ऑफर
तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!
Comments are closed.