मुंबई| सध्या राज्यात सरकारनं वृत्तपत्र सुरू करण्याला परवानगी दिली असली तरी घरोघरी जाऊन वितरण करण्याला मात्र सरकारनं बंदी घातली आहे. यावर माजी मुख्ममंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. तसंच वृत्तपत्र सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटल्याचंही सांगितलं. फडणवीसांनी केलेल्या या टीकेवर मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांना टोला मारला आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस सांगतात, ‘वृत्तपत्र वितरणावरील बंदी उठवा. हे बरोबर नाही.’ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमचे निर्णय तुम्ही घेतले आहेत, असं म्हणत राऊतांनी अग्रलेखातून फडणवीसांवर टीका केली आहे.
वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत व्हावे आणि टिळक, आगरकर, अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शस्त्र तेजाने तळपत राहावे. हे शस्त्र कोणालाही मोडता येणार नाही, ते बोथट होणार नसल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढून वृत्तपत्रांना ‘लॉक डाऊन’मधून बाहेर काढले, पण घरोघरी वितरण करण्यावर मात्र निर्बंध घातले आहेत. वृत्तपत्र छपाईला परवानगी पण वितरणाला बंदी हा ठाकरे सरकारचा अजब फतवा असल्याची टीका सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्क कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण
आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील सरपंचाच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; फोन करून केली आपुलकीने चौकशी
जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न; नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार
सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल
Comments are closed.