बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उस्मानाबादेत एकाशेजारी एक 19 चिता पेटल्या, जागा कमी पडल्यानं 8 अंत्यसंस्कार उद्या

उस्मानाबाद | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाचं आणखी एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत असल्याचं याआधी अनेक शहरांमधून समोर आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये काही अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची परिस्थिती दाखवणारं हे अत्यंत दाहक चित्र आहे.

उस्मानाबाद शहराच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीत आज १९ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जागा अपुरी पडल्याने ८ मृतदेहांचे अंत्यसंस्कार उद्यावर ढकलण्यात आले आहेत. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत जे १९ अंत्यसंस्कार झाले तेही अत्यंत दाटीवाटीने करण्यात आले, एक एक फूट जागा ठेवून सरण रचण्यात आले होते.

महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. उस्मानाबादसारखं चित्र याआधी महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी पहाण्यात आलं आहे. स्मशानभूमीत जागा सोडा आता सरणासाठी लाकडं मिळणंही कठीण झाल्याची माहिती आहे, त्यामुळे कमी लाकडांमध्ये सरण पेटवावं लागत आहे.

आपल्या आप्तांचा अशाप्रकारे निरोप द्यावा लागत असल्याने अनेकांना अश्रू अनावर होताना दिसत आहेत. उस्मानाबादमध्ये ४९४० कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत, मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे ५९० रुग्ण आढळले, तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

संचारबंदीमुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेवर; बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More