उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?

Maharashtra Police Bharti l कित्येक दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच अखेर आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17 हजार 471 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जून पासून सुरवात होणार आहे. त्यामुळे कित्येक तरुणांचे स्वप्न आता साकार होणार आहे.

राज्यात 17 हजार 471 जागांसाठी तब्बल 17 लाखांहून अधिक अर्ज :

राज्यातील पोलीस भरती अंतर्गत 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह विभागातील एक हजार 800 पदांसाठी तब्बल तीन लाख 72 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातील माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.

पोलीस भरती विभागाअंतर्गत बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 इकचुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे तब्बल 207 उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत. याशिवाय चालक या पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून तब्बल 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. तसेच सर्वात जास्त या पोलीस शिपाई पदासाठी आहेत. यामध्ये देखील 9595 जागांसाठी सूमारे 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार,असं याचं गुणोत्तर करण्यात आलं आहे.

Maharashtra Police Bharti l पोलीस भरतीवर पावसाचे संकट :

राज्यातील शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी सुमारे 3 लाख 50 हजार 592 अर्ज आले आहेत. म्हणजेच या पदाच्या एका जागेसाठी 80 उमेदवार स्पर्धेत उतरले आहेत. या अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या संधींमुळे त्यांनी अर्ज केले असावेत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात होत आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण दिसत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रिये दरम्यान जर पाऊस पडला तर विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्या उमेदवाराने एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

News Title – Maharashtra Police Bharti 2024

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो

राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ

“हनीमूनच्या दिवशी माझ्या शरिरावर…”, करिश्माच्या खुलाशाने खळबळ!

“ऋषी कपूरमुळे माझं आयुष्य बरबाद..”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप