बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र पोलिसांचा विदेशात डंका! एपीआय सुभाष पुजारींनी पटकावलं कांस्य पदक

मुंबई | महाराष्ट्र पोलिसांची जगातील सर्वोत्तम पोलिसांत गणना होते. पण गेल्या काही दिवसात या प्रतिमेला तडा गेल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून आपण नेहमीच चांगल्या सुव्यवस्थेची अपेक्षा करत असतो. आता पीआय सुभाष पुजारी यांनी आपल्या कामगिरीनं महाराष्ट्र पोलिसांची मान अवघ्या जगात उंचावली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ब्राॅंझ पदक मिळवलं आहे. ताश्कंद उझबेकीस्तान येथे 3 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान 12 वी जागतीक बाॅडीबिल्डींग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. सुभाष पुजारी सध्या महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे मुंबई येथे कर्तव्यावर आहेत.

सुभाष पुजारी मुळचे कोल्हापूरच्या हातकणंगले येथील आहेत. पोलीस दलात कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपली व्यायामाची आवड जोपासली आहे. त्यांच्या या यशानं राज्यभरातून पुजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुभाष पुजारी यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीनं पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवली आहे.

दरम्यान, सुभाष पुजारी यांच्या कामगिरीनं पुन्हा एकदा राज्य पोलिसांची मान अभिमानानं उंचावली आहे. त्यामुळे आता सुभाष पुजारी यांचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या 

शिवसेना देशातील दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; ‘या’ माध्यमातून मिळाले कोट्यावधी रूपये

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, हैदराबाद पॅटर्न राबवण्याची गरज”

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रविण दरेकरांनी दिला पार्थ पवारांचा दाखला

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रोमोची तुफान चर्चा; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More