Loading...

बैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी

मुंबई |  सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. दिल्लीत बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कळतीये.

दिल्लीत राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाल्याची माहितीही कळतीये. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहितीये.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे ही राष्ट्रवादीची मागणी आहे. उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते मुंबईत परतणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...