“रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”

Maharashtra Politics | राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आता शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांनी थेट आमदार रवी राणांवर निशाणा साधत महायुतीला इशारा दिला आहे. शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी भाजपवर राज्यपाल पदाचे आश्वासन देऊन विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. तसंच माजी खासदार नवनीत राणांच्या जात वैधतेला देखील त्यांना आव्हान दिलं होतं. अशात आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Maharashtra Politics)

“रवी राणा सारखे छपरी लोक महायुतीमध्ये असतील तर आम्ही बाहेर निघू” असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आणि संसदीय असल्याची टीका अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

“..तर आम्ही युतीतून बाहेर पडू”

“युतीमध्ये असून एका ज्येष्ठ नेत्याचा अवमान करत असतील, त्यांना अशा भाषेत बोलत असतील तर, अशा नेत्यांना महायुती मधून बाहेर फेकले गेले पाहिजे. हे छपरी लोक जर महायुतीमध्ये राहत असतील तर आम्ही शिवसेनेतून बाहेर पडू. आम्ही युतीमध्ये राहायचे की नाही, याचा निर्णय घेऊ.”, असा इशाराच अभिजीत अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद अजूनच वाढला आहे.

राज्यपाल पदाच्या वादावर देखील अभिजीत अडसूळ यांनी भाष्य केलं आहे. “अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असं पत्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे दिलं होतं. तेव्हा अमित शाह यांच्या विनंतीला मान देत लोकसभेची निवडणूक लढवली नाही. पण, आज जर ते लढले असते तर निवडून आले असते.”, असं अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत.(Maharashtra Politics)

अभिजीत अडसूळ vs रवी राणा

अभिजीत अडसूळ यांनी काल एका ठिकाणी बोलताना देखील जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “अमित शाह यांनी स्वतः मार्च महिन्यात आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द दिला होता. मग यादीमध्ये त्यांचे नाव का नाही? महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला.”, असा आरोप त्यांनी केला होता. (Maharashtra Politics)

तसंच बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा, असा संतप्त सवाल अभिजीत अडसूळ यांनी केला होता. आज तर त्यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात याची जोरदार चर्चा आहे.

News Title – Maharashtra Politics abhijeet adsul on Ravi Rana

महत्त्वाच्या बातम्या-

…यापुढे शेतीचं वीजबिल भरू नका; जाणून घ्या थकबाकी बिलाचं काय?

आज नीरज चोप्रा खेळणार फायनल सामना; कुठे, किती वाजता पाहता येणार सामना?

राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी

बाजारात आलाय सर्वात बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का!