Maharashtra Politics | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत. ठाकरे सातत्याने सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत. आगामी काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे, या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष पावले टाकत असून कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपने ‘अब की पार 400 पार’चा नारा दिला आहे. अशातच विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला.
अशातच आता शिवसेनेचे उपनेते आणि 25 वर्ष आमदार राहिलेल्या बबनराव तथा नाना घोलप यांनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. मागील काही दिवसांपासून ते ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. आज अखेर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून घोलप हे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती, ज्याला आज पूर्णविराम मिळाला.
उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
दरम्यान, घोलप यांनी राजीनामा दिला असला तरी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. खरं तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घोलप यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिकच्या राजकारणातील एक मोठा चेहरा म्हणून घोलप यांची ओळख आहे. ‘लोकमत’ या वृत्तसंस्थेशी बोलताना घोलप यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आज मी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत निष्ठेने पक्षाचे काम केले सर्वकाही केले. पक्षाने जे सांगितले, जो आदेश दिला त्याचे मी पालन केले. पण मी आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics । घोलपांचा राजीनामा
अचानक मला शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकून अपमानित केले. मी ज्या पदाधिकाऱ्यांना निष्क्रिय म्हणून काढून टाकले होते आणि नवीन पदाधिकारी नेमले होते ते देखील बदलण्यात आले आहेत. सतत होत असलेला अपमान किती सहन करायचा. नवीन पदाधिकाऱ्यांना बदलण्यात आले हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न घोलप यांनी विचारला.
दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी जुन्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दिली होती. जुने पदाधिकारी बिनकामाचे असल्याचे वरिष्ठांना सांगण्यात आले. हे असे असताना देखील नव्याने नेमण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याने मी अचंबित झालो. आमचे नेमके काय चुकले हे माहिती नाही, मी याबाबत दाद मागितली पण उत्तर मिळाले नाही, असेही बबनराव घोलप यांनी सांगितले.
News Title- Former minister babanrao gholap has resigned from Uddhav Thackeray’s Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या –
‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण
“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
जरांगेच्या आंदोलनाचा सहावा दिवस; प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी अधिवेशन
युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळणार पाकिस्तानचे खेळाडू; बाबर आझमसह अनेकांचा सहभाग
“तुमच्यासारखी लोक इतिहास बदलतात कारण…”, शिल्पा शेट्टीने मोदींचे मानले आभार