महाराष्ट्रात श्रेयचोरांचा सुळसुळाट!, रोहित पवार आणि रवींद्र धंगेकरांचा उल्लेख

Maharashtra Politics | काही दिवसांपूर्वीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे. सुरुवातीला या योजनेबाबत विरोधकांनी जोरदार टीका केली. ही योजना म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची जुमलेबाजी असल्याचं विरोधी गटाने म्हटलं. मात्र, नंतर विरोधी नेत्यांनी याच योजनेची जाहिरातबाजीही केली.

यावरूनच आता भाजपाने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जाहिरातबाजी करत(Maharashtra Politics )  पुण्यात बऱ्याच ठिकाणी बॅनर लावले आहेत.

भाजपची जोरदार टीका

यासोबतच शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जाहिरात बाजी केली आहे. मात्र, जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न वापरता महाविकास आघाडीचे फोटो लावण्यात आले आहेत. भाजपाने याला श्रेयचोरांचा सुळसुळाट असं म्हणत जोरदार टीका केली आहे.

तसंच श्रेयचोरांचे ‘स्मॉलर व्हर्जन’ म्हणजे रोहित पवार, असा खोचक (Maharashtra Politics ) टोला देखील भाजपाने लगावला आहे. याबाबत भाजपाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर एक ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट आता चर्चेत आलं आहे. यात भाजपाने रोहित पवार आणि रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली आहे.

“आत्या आणि भाचा यांच्या शब्दकोशात ‘स्वकर्तृत्व’ शब्दच नाही”

“विधानभवनात महायुती सरकारच्या योजनांचा विरोध करायचा आणि नंतर स्वतःचे नावं लावून त्याच योजनांची जाहिरातबाजी करायची हा दुटप्पीपणा आजोबांकडून शिकलात का?”, असा सवाल करत भाजपने रोहित पवारांसह शरद पवारांना देखील (Maharashtra Politics ) टार्गेट केलंय.

“आत्या आणि भाचा यांच्या शब्दकोशात ‘स्वकर्तृत्व’ हा शब्दच नाही. खरंतर माविआ सरकारने लोकसभा निवडणुकीत महिलांच्या खात्यात खटाखट साडे आठ हजार रुपये येणार असं खोटं सांगत गोर गरीबांकडून मत लाटली. नंतर मात्र पाठ फिरवली.”, असा टोला लगावत भाजपाने खासदार सुप्रिया सुळे यांना देखील टार्गेट केलं. एकंदरीतच काय …यांना विकासाची कामं कधी जमत नाही… आणि श्रेयचोरीच्या मामल्यात मविआचा हात कोणी पकडू शकत नाही, अशी टीका भाजपाने केली आहे.

News Title – Maharashtra Politics bjp target Rohit Pawar and Ravindra Dhangekar

महत्त्वाच्या बातम्या-

“आपण पुन्हा एकत्र यायला हवं”, संजय राऊतांची महायुतीच्या नेत्यांशी गळाभेट; राजकीय वर्तुळात एकच चर्चा

“स्मृती इराणी यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं बंद करा”; राहुल गांधींनी ट्वीट करत केलं आवाहन

सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण

प्री-वेडिंगवरच हजार कोटी उडवले, लग्नासाठी तर तब्बल..; अंबानींच्या लग्नातील खर्चाचा आकडा समोर

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?