भाजपला आणखी एक मोठा झटका; माजी आमदार तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics | लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) हे लवकरच पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नाही तर, ते लवकरच शरद पवारांच्या गटात जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला मोठा दणका दिला आहे. या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपला मोठे धक्के देत आहेत.छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंकल्प दौऱ्यात माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांनी  ठाकरे गटात प्रवेश केलाय.

लातूरमध्ये भाजपला धक्का

यानंतर शरद पवार यांनी आता भाजपला जोराचा झटका दिलाय. भाजपला मराठवाड्यात हा दुसरा दणका बसणार असल्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे येत्या 11 जुलैरोजी आपल्या मोजक्या समर्थकांसह मुंबईमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी (Maharashtra Politics) मोठा धक्का मानला जाईल. सुधाकर भालेराव हे राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षातून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचा माजी आमदार शरद पवार गटात जाणार?

यापूर्वी अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. अशात सुधाकर भालेराव यांनीही प्रवेश केला तर लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील. यामुळे पवार गटाची ताकत तर वाढेल पण भाजपला हा मोठा (Maharashtra Politics) धक्का मानला जाईल.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येथेही भाजपला मोठा धक्का बसला आहे.

News Title – Maharashtra Politics Discussions of former BJP MLA joining Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

“वरळी अपघातातील आरोपीचे मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध, आरोपी सुरतला पळाला की गुवाहाटी?”

राज्यात अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; बळीराजा पुन्हा हवालदिल

अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे टाकणार ‘ही’ जबाबदारी?, लवकरच बांधणार शिवबंधन

शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात