बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; काँग्रेसच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेना-राष्ट्रवादी नाराज!

मुुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने केलेल्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि सेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केला आहे.

घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणूक केल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विचारात न घेता केलेल्या नेमणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राष्ट्रवादीच्या खात्यातील मंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

रिक्षात बसलेला तरुण पोलिसांना वाटला संशयास्पद; झडती घेतल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार!

भारतीय क्रिकेट संघाला 2 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये ठेवणार विलगीकरणात

पत्नीला घेऊन पतीची धावाधाव, 12 तासात चार रुग्णालयांनी नाकारलं; अखेर सायन रुग्णालयात महिलेचा मृत्यू

‘…त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही; अशोेक गेहलोत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More